सीकेपी सहकारी बँकेचा परवाना परवाना रद्द

सीकेपी सहकारी बँकेचा परवाना परवाना रद्द

दिल्ली – पीएनबी, येस बँकेप्रमाणेच आणखी एका बँकेवर आणि पर्यायाने बँकेच्या खातेदारांवर करोनाच्या संकट काळातच आर्थिक कुर्‍हाड कोसळली आहे. सीकेपी सहकारी बँकेचा परवानाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रद्द केला आहे. सीकेपी सहकारी बँक आणि तिच्या खातेदारांवर ही कुर्‍हाड कोसळली असून बँकेला कलम 35 लागू करण्यात आलं आहे. गुरुवारी रात्री या बँकेचा परवाना रद्द करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारने मदत करावी अशी देखील मागणी करणारी याचिका बँकेच्या ठेवीदारांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. 2013पासूनच बँकेच्या व्यवहारांवर आर्थिक बेशिस्तीमुळे रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com