नगर – जिल्हा रुग्णालयात लवकरच कोरोना टेस्ट लॅब कार्यान्वित; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली लॅबला भेट
Featured

नगर – जिल्हा रुग्णालयात लवकरच कोरोना टेस्ट लॅब कार्यान्वित; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली लॅबला भेट

Sarvmat Digital

अहमदनगर – येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड-१९ चाचणी प्रयोगशाळा उभारण्यात आली असून लवकरच ती कार्यान्वित होणार आहे. चाचणी स्वरुपात गुरुवारी येथे सुरुवात झाली असून इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) अधिकृत मान्यतेनंतर कोरोना संदर्भातील चाचण्यांना सुरुवात होणार आहे. राज्याचे गृहनिर्माणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या प्रयोगशाळेला भेट देऊन पाहणी केली.

या कोरोना चाचणी लॅबमुळे जिल्ह्यातील कोरोना आजाराची लक्षणे असणार्‍या व्यक्तींची चाचणी लवकर करणे सोपे होईल आणि प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह या कोरोना टेस्ट लॅबला भेट दिली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे, जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाणे आदी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com