मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पवित्र दीक्षाभूमीला भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पवित्र दीक्षाभूमीला भेट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पवित्र दीक्षाभूमीला भेट दिली. सर्वप्रथम दीक्षाभूमीच्या स्तुपासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्प वाहून वंदन केले. स्तूपातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन गौतम बुद्धाच्या मूर्तीला पुष्प वाहून वंदन केले.

नागपूर :

या वेळी सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम) आणि आदिवासी विकास मंत्री डॉ. नितीन राऊतखासदार विनायक राऊतमाजी खासदार प्रकाश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दीक्षाभूमी आगमन प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटेडॉ. सुधीर फुलझेलेॲड. आनंद फुलझेले यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

शालदीक्षाभूमीची प्रतिमा देऊन मुख्यमंत्री यांचा सत्कार केला. स्तूपातील बांधकाम करण्यात येत असलेल्या सभागृहाची पाहणी केली. दीक्षाभूमीला भेट देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांशी  मुख्यमंत्री ठाकरे यांनी हस्तांदोलन करुन त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. दीक्षाभूमीला भेट देण्यास आलेल्या नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com