रसायनशास्त्र : तब्बल 48 कॉपीबहाद्दर
Featured

रसायनशास्त्र : तब्बल 48 कॉपीबहाद्दर

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी) – इयत्ता दहावीच्या रसायशास्त्र परीक्षेत जिल्ह्यामध्ये बुधवारी तब्बल 48 कॉपी बहाद्दरांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) दिलीप थोरे यांनी दिली.

बुधवारी रसायशास्त्र विषयाची परीक्षा होती. या पथकाने जिल्ह्यातील विविध केंद्रांत तपासणी करून 48 कॉपी बहाद्दरांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यात सर्वाधिक पाथर्डी तालुक्यातील आहेत. यामध्ये पाथर्डी तालुक्यातील तनपुरवाडी केंद्रावर तीन, खरवंडी केंद्रावर आठ, तिलोज जैन विद्यालयातील केंद्रावर नऊ, बाबुजी आव्हाड विद्यालयाच्या केंद्रावर 16 आणि आश्वी (ता. संगमनेर) येथील केंद्रावर आठ, ल.ना. होशिंग 6-जामखेड, नंदादेवी विद्यालय (नान्नज) 4 असे एकूण 48 कॉपीबहाद्दर सापडले. या सर्वांवर नियमाप्रमाणेकारवाई करण्यात येणार असल्याचे थोरे यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com