बंदुकीचा धाक दाखवून कार पळविली
Featured

बंदुकीचा धाक दाखवून कार पळविली

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी ) – बंदुकीचा व चाकूचा धाक दाखवून एकाला लुटण्याची घटना सोमवारी भर दुपारी विळद घाटातील निर्जनस्थळी घडली. याप्रकरणी हर्षद नाटेश्वर सोनवणे (वय- 35 रा. म्हसवड ता. मान जि. सातारा) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोनवणे यांना दौलताडी (पूर्ण नाव माहित नाही) नाव असलेल्या दोघा अनोळखी इसमांनी बळजबरीने कारमध्ये (क्र. एमएच- 12 जीआर- 4203) बसविले. नगर येथून जेसीबीचा चालकाला आणायचे आहे, अशी बतावणी केली.

सोनवणे यांना दोघांनी विळद परिसरातील डोंगराळ भागात निर्जनस्थळी आणले. एकाने सोनवणे यांच्या गळ्याला चाकू लावला तर, दुसर्‍याने डोक्याला बंदुक लावली. खिशातील मोबाईल काढून घेतला व सोनवणे यांना धकाबुक्की करून कारच्याखाली ढकलून दिले.

कार घेवून घटनास्थळावरून पोबारा केला. सोनवणे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोघा अनोळखी इसमांवर जबरी चोरी, आर्म अ‍ॅक्ट कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com