नेवासा – भरधाव कारने एकास चिरडले
Featured

नेवासा – भरधाव कारने एकास चिरडले

Sarvmat Digital

नेवासा बु. (वार्ताहर) – नेवासा कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ भरधाव वेगात असणाऱ्या कारने एकास चिरडले आहे. या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी, रविवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास खडका फाट्यावरून नेवासाकडे येणाऱ्या स्विफ्ट मारुती कारने पायी चालणाऱ्या जगन्नाथ गंगाधर पवार वय (६५) यांना चिरडून सदरची गाडी दिशा दर्शक फलकाला आदळून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या काट्यात शिरली. या अपघातात पवार जागीच ठार झाले. घटना स्थळी पोलिस दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com