बस वाहक-चालकांचा प्रामाणिकपणा पाच तोळ्याचे दागिने केले परत
Featured

बस वाहक-चालकांचा प्रामाणिकपणा पाच तोळ्याचे दागिने केले परत

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी) – तारकपूर आगाराची बस कल्याण-नगर मार्गावर धावत असतांना एका महिलेची पर्स बसमध्ये विसरली. त्या पर्समध्ये 5 तोळे सोन्याचे दागिन्यांसह इतर साहित्य बस वाहक व चालक यांनी प्रामाणिकपणा दाखवत सहायक वाहतुक अधीक्षक विठ्ठल केंगारकर यांच्याकडे जमा करूण संबंधित महिलेला दागिन्यासह पर्स परत केली.

याबाबत माहिती अशी की, रविवार (दि. 15) रोजी तारकपूर आगाराची बस (क्र.9433) कल्याण मार्गे नगर येथील तारकपूर डेपोत आली. त्यावेळी बस चालक एम.यू.वारे व वाहक के.एस.सांगळे यांना बसमध्ये प्रवाशी महिलेची पर्स निदर्शनास आली. त्यांनी ही पर्स प्रामाणिकपणा दाखवत सहायक वाहतूक अधीक्षक विठ्ठल केंगारकर यांच्याकडे जमा केली.

त्यामध्ये अंदाजे 5 तोळे सोन्याचे दागिने व इतर वस्तू असल्याचे निदर्शनात आले. त्याचवेळी महिला प्रवाशी पर्सची विचारणा करत आली असता राज्य परिवहन नियमानुसार पर्सची ओळख पटवून विजया खोकराळे यांना मुद्देमाल सुखरूप परत करण्यात आला. यावेळी विजया खोकराळे यांनी चालक व वाहक याचे आभार मानले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com