आजपासून एसटी सुरू
Featured

आजपासून एसटी सुरू

Sarvmat Digital

जिल्ह्यातून सर्व बसस्थानकातून बसेस, 50 टक्केच प्रवासी

अहमदनगर (प्रतिनिधी)- लॉकडाऊन असलातरी प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नगर जिल्ह्यात अंतर्गत एसटीबस वाहतूक आजपासून सुरू केली आहे. त्यानुसार सर्व तालुक्यांच्या बसस्थानकांतून नगरसाठी बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे 50 टक्के आसन क्षमतेनुसारच या बसेस सोडण्यात येणार आहे. तसेच अन्य नियमही पाळावे लागणार आहेत.

सोडण्यात येणार्‍या बसेस अशा- तारकपूर ः नगर-संगमनेर (12 फेर्‍या), नगर-वांबोरी (12 फेर्‍या), तारकपूर-राशीन (4 फेर्‍या), नगर-पाथर्डी (8 फेर्‍या). शेवगावः शेवगाव-नगर (18 फेर्‍या), शेवगाव-संगमनेर (6फेर्‍या). जामखेडः जामखेड-नगर (4फेर्‍या), जामखेड-कर्जत (4फेर्‍या). श्रीरामपूरः श्रीरामपूर -कोपरगाव (8फेर्‍या), श्रीरामपूर -नगर (24फेर्‍या). कोपरगावः कोपरगाव-श्रीरामपूर (8फेर्‍या), कोपरगाव-संगमनेर (4फेर्‍या), कोपरगाव-नगर (12फेर्‍या). पारनेरः पारनेर-सुपा-नगर (6फेर्‍या), पारनेर-जामगाव-नगर (6फेर्‍या). संगमनेरः संगमनेर-नगर (10फेर्‍या). श्रीगोंदाःश्रीगोंदा-नगर (8फेर्‍या), श्रीगोंदा-कर्जत (6फेर्‍या). नेवासाः नेवासा-नगर((8फेर्‍या), नेवासा-शिर्डी. (8फेर्‍या).पाथर्डीःपाथर्डी-नगर(8फेर्‍या), पाथर्डी-शेवगाव (8फेर्‍या). अकोलेःअकोले-राजुर (10फेर्‍या), अकोले-संगमनेर (16फेर्‍या)अकोले-मोग्रस-कोतूळ (6फेर्‍या).

संगमनेरातून फक्त नगर, शिर्डीतून बसेस नाही
जिल्हा अंतर्गत एसटी बसेस आजपासून सुरू होत आहे. याअनुषंगाने सर्व बसस्थानकांतून बसेसच्या फेर्‍या सुरू करण्यात येत आहेत. संगमनेरातून केवळ नगरसाठी 10 फेर्‍या होणार आहेत. तर शिर्डीतून बाहेर एकही बस सोडण्यात येणार नाही. शिर्डीसाठी केवळ नेवासा-शिर्डी एकच बस जाणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com