बीएसएफ जवानाला कोरोनाची लागण
Featured

बीएसएफ जवानाला कोरोनाची लागण

Sarvmat Digital

भोपाळ – मध्यप्रदेशमधील बीएसएफ जवानाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.जवानाची पत्नी नुकतेच लंडनवरुन भारतात परतली होती. त्यामुळे पत्नीद्वारे या जवानाला कोरोनाची लागण झाली असावी, अशी माहिती मिळते आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मध्यप्रदेशातील ग्वालियर जिल्ह्यात टेकनपूर येथे बीएसएफ जवानांचे  ट्रेनिंग सेंटर आहे. तेथील एका अधिकाऱ्याला कोरोनाचे लक्षण दिसता त्याची चाचणी करण्यात आली व त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या जवानासोबत असलेल्या 50 इतर जवानांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com