5 हजारांची लाच घेताना शिर्डीतील उपनिरीक्षकासह हवालदार चतुर्भुज
Featured

5 हजारांची लाच घेताना शिर्डीतील उपनिरीक्षकासह हवालदार चतुर्भुज

Sarvmat Digital

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – ट्रॅक्टर चोरीच्या गुन्ह्यात तक्रारदार यांना आरोपी न करण्यासाठी व फायनल अहवाल न्यायालयामध्ये पाठवण्यासाठी शिर्डी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व पोलीस नाईक या दोघांना 5 हजारांची लाच घेताना नाशिक व नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. या दोन पोलीस कर्मचार्‍यांना कोपरगाव येथील न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

शिर्डी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शामवेल मिसाळ, शिर्डी पोलीस ठाणे, चालक पोलीस नाईक महेश महादेव पालवे, शिर्डी पोलीस ठाणे, असे आरोपीचे नावे आहे. दरम्यान लोकसेवक सहाय्यक फौजदार प्रशांत मिसाळ व पोलीस नाईक महेश पालवे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ट्रॅक्टर चोरीच्या गुन्ह्यात तक्रारदार यांना आरोपी न करण्यासाठी व नमूद गुन्ह्याचा फायनल अहवाल न्यायालयामध्ये पाठवण्यासाठी आरोपी लोकसेवक मिसाळ व पालवे यांनी दिनांक 1 फेब्रुवारी रोजी तक्रारदार याचेकडे 5 हजार रुपये लाचेची मागणी केली असता तक्रारदार याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करताच नाशिक व अहमदनगर येथील पथकाने शनिवार दि. 1 फेब्रुवारी सायंकाळच्या सुमारास शिर्डीत सापळा लावून सहाय्यक फौजदार प्रशांत मिसाळ यास 5 हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. सहाय्यक फौजदार प्रशांत मिसाळ व पोलीस नाईक महेश पालवे या दोघांविरूद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिसाळ व पालवे यांंना कोपरगाव येथील न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com