Wednesday, April 24, 2024
Homeनगरसामाजिक वनीकरण अधिकार्‍यासह पत्नी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

सामाजिक वनीकरण अधिकार्‍यासह पत्नी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

गुन्हा दाखल; चौकशीसाठी दोघेही ताब्यात

सुपा (वार्ताहर) – उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा अधिक संपत्ती जमविल्याप्रकरणी प्रादेशिक लागवड अधिकारी सामाजिक वनीकरण वनविभाग अहमदनगर यांना व त्याच्या पत्नीला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

सुपा पोलीस स्टेशनला श्याम रामचंद्र पवरे वय 44 पोलीस निरीक्षक अँटी करप्शन ब्युरो अहमदनगर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, केशव रभाजी फंड वय 53 प्रादेशिक लागवड अधिकारी सामाजिक वनीकरण वनविभाग अहमदनगर व त्याच्या पत्नी सविता केशव फंड रा. सुपा ता. पारनेर यांनी वन विभागात कार्यरत असताना सन ऑक्टोबर 1983 ते मे 2014 या कालावधीत सन 2000, मध्ये 139953 सदर वर्षाच्या उत्पादनाच्या 24 टक्के, सन 2003 मध्ये 15896 सदर वर्षीच्या उत्पन्नाच्या 4 टक्के, सन 2005 मध्ये 291237 सदर वर्षाच्या उत्पनाच्या 55 टक्के असे एकूण 447083 रुपये अशी नमूद वर्षाच्या उत्पनाच्या ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिक अपसंपदा (संपत्ती) संपादित केली आहे.

म्हणून आरोपी केशव फंड याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम 1988 (संशोधन 2018) चे कलम13 (1) (ब) व आरोपी सविता फंड यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम 1988 (संशोधन2018) चे कलम 12 प्रमाणे गुन्हा केल्याचे सकृतदर्शनी निष्पन्न झाले आहे. या दोघांविरुद्ध सुपा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्हीही आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास अहमदनगर येथील विशेष पथक करीत आहे. सुपा परिसरात आशा प्रकारची घटना प्रथमच घडल्याने अधिकारी वर्गात खळबळ उडाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या