Friday, April 26, 2024
Homeनाशिककळवण : पाळे खुर्द शिवारात बिबट्याचे बछडे आढळून आल्याने खळबळ!

कळवण : पाळे खुर्द शिवारात बिबट्याचे बछडे आढळून आल्याने खळबळ!

पुनदखोरे | वार्ताहर

तालुक्यातील पाळे खुर्द शिवारातील शेतात ऊसतोड मजुरांना बिबट्याचे तीन बछडे आढळून आले आहेत. बिबट्याच्या मादीचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून या बाबत वनविभागाला माहिती देण्यात आली आहे. वनविभागाने पिंजरा लावण्यात आला आहे.

- Advertisement -

कळवण तालुक्यात सध्या कांदा लागवड व ऊसतोड हंगाम जोमात सुरु आहे. पाळे खुर्द ता. कळवण येथील विकी दादाजी पाटील यांचे गट नंबर 415 या शेतात ऊसतोड सुरु असतांना दुपारी चार वाजता मजुरांना बिबट्याचे 10 ते 12 दिवसांचे नवजात तीन बछडे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

कळवण तालुक्यात कांदा लागवड व ऊसतोड सुरु आहे. वीज वितरण कंपनीकडून शेतीसाठी रात्रीचा वीजपुरवठा सुरु असल्याने शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी भरल्याशिवाय पर्याय नसल्याने त्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. बिबट्याच्या भीतीने नागरिकांचे रात्री घराबाहेर निघणेही मुश्किल झाले आहे. 

वनविभागाने तातडीने उपायोजना करून बिबट्याला जेरबंद करावे.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण  पसरले आहे. सध्या कांदा लागवडीचा मोसम सुरु असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

-विकी पाटील, शेतकरी

- Advertisment -

ताज्या बातम्या