बोधेगाव परिसरातून खासगी दवाखाने अचानक बंद, रुग्णांची गैरसोय
Featured

बोधेगाव परिसरातून खासगी दवाखाने अचानक बंद, रुग्णांची गैरसोय

Sarvmat Digital

डॉक्टरांविरुध्द जनतेतून महासंताप व्यक्त

बोधेगाव (वार्ताहर)- कोरोना प्रतिबंध घालण्यासाठी आरोग्य विभाग 24 तास झटत असताना बोधेगाव येथील सर्वच खासगी डॉक्टरांनी बुधवारी अचानक पळ काढला आहे. संकट काळात पळ काढणार्‍या व देवदूत समजल्या जाणार्‍या डॉक्टरांविरुध्द बोधेगावसह परिसरातून जनतेतून महासंताप व्यक्त होताना दिसत आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुकारलेल्या संचारबंदीमध्ये अत्यावश्यक सेवांमध्ये खाजगी दवाखाने हॉस्पिटल, मेडिकल वगळले असेले तरीदेखील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे खासगी 16 दवाखान्यापैकी दोन डॉक्टर वगळता असंख्य डॉक्टरांनी दवाखाने आज बुधवारी सकाळ पासून अचानक बंद ठेवले आहेत. त्यामुळे बोधेगाव येथील नागरिकांनी संताप व्यक्त करून यापुढे खासगी दवाखाना न बघता केवळ सरकारीच दवाखान्यामध्ये जाण्याची भावना व्यक्त केली मात्र तिथेही वैद्यकीय अधिकारी कर्मचारी नसल्याने आरोग्य सुविधांचा संपूर्ण बोजवारा उडवून जनता हतबल झाली आहे त्यात

संपूर्ण जगावर आलेल्या करोनाच्या संकटात डॉक्टरच केवळ देव आहेत, अशी भावना समाजात एकीकडे असतानाच बोधेगाव येथे येथे मात्र ङ्ग देवफ पळपुटे बनले गेले आहेत, असे चित्र पाहयला मिळत आहे.

बोधेगाव हे पूर्व भागातील 35- 40 गावचे मध्यावरती ठिकाण असून शहरात जवळपास 12 ते 16 खासगी दवाखाने असून त्यातील डॉ भिसे व डॉ अजय कुलकर्णी या दोघांनी दवाखाने सुरू ठेवली मात्र इतर सगळेच दवाखाने बंद आहेत. चौकशी केली तर बाहेर गावी गेले आहेत अशी उडवाउडवीची उत्तरे दिली तर काहींनी चक्क कुलूप ठोकून पलायन केल्याचे दिसून आले , गर्भवती स्त्रिया , ज्येष्ठ नागरिक व इतर रुग्णांना केवळ सरकारी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे.

मात्र आधीच बोधेगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व पुरेसे कर्मचारी नसल्याने आरोग्य सुविधा मिळत नाहीत पाठोपाठ आता कोरोनाच्या संकटात खाजगी डॉक्टरांनी काही जणांचे उपचार अर्ध्यावरच सोडून बाहेर आपल्या पळ काढला आहे. यांमुळे करोना नव्हे इतर साथीच्या आजारांनीही त्रस्त होण्याची वेळ

बोधेगाव सह परिसरातील हजारो जनतेवर येऊन ठेपली आहे. मात्र शासकीय पाठोपाठ खाजगी आरोग्य सुविधांचा अभाव झाल्यामुळे वैद्यकीय सेवा असून अडचण मनसून खोळंबा, आज अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिक पुरेशा उपचारा अभावी मृत्यूच्या दाढेत उभे ठाकले आहेत वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टरच भीती बाळगत असल्याने सामान्य जनतेचे काय असा संतप्त सवाल जनतेतून व्यक्त आहे तसेच जनतेचे तारणहार समजले जाणारे आमदार, खासदार सह इतर लोकप्रतिनिधींला मात्र संकटात जनतेचे काही देणेघेणे नसल्यासारखे वाटत आहे.

आरोग्य प्रशासनाची डोळेझाक…? 
बोधेगाव येथे जवळपास 14-ते 16 खाजगी दवाखाने आहेत व जवळपास 15 ते 20 मेडिकल्स स्टोअर्स आहेत त्यातील असंख्य मेडिकल्स अनधिकृतपणे खाजगी डॉक्टर चालवत आहेत त्याकडे आरोग्य विभाग मात्र दुर्लक्ष करीत सामन्याच्या जीवनाशी खेळत आहे, मेडिकल्स दुकानात अनुभवी कर्मचार्‍यांचा वानवा दिसत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com