Wednesday, April 24, 2024
Homeनगरपोलीस आणि माजी संचालकाच्या सतर्कतेमुळे बँकेची लाखोंची रोकड बचावली

पोलीस आणि माजी संचालकाच्या सतर्कतेमुळे बँकेची लाखोंची रोकड बचावली

बोधेगाव (वार्ताहर)- शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील हुंडेकरी नगरमध्ये असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएमचे लोखंडी शटर गॅस कटरच्या साहाय्याने कापून त्यातील रोकड लंपास करण्याचा दरोडेखोरांचा प्रयत्न सायबर सेल, पोलीस, जागा मालक आणि केदारेश्वर साखर कारखान्याच्या माजी संचालकाच्या जागरुकतेमुळे अयशस्वी ठरला. विशेष म्हणजे यात एका पाळीव कुत्र्यानेही उत्तम कामगिरी केली.

रविवारी (दि.12) पहाटे सव्वा तीनच्या सुमारास येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएमच्या लोखंडी शटरला दरोडेखोरांनी अत्याधुनिक गॅस कटरच्या सहाय्याने अंदाजे दोन बाय दोन अंतराचे छिद्र पाडले. त्या छिद्रातून या दरोडेखोरांनी अलगद आत प्रवेश करत गॅस कटरचा पाईप आत घेतला आणि त्याच्या सहाय्याने रोकड ठेवलेले एटीएम मशीन कापण्याचा प्रयत्न सुरू केला.

- Advertisement -

याचा आवाज आल्याने दररोज बँकेच्या दारात असलेला पाळीव कुत्रा जोरजोराने भुंकत मालकाच्या घरी गेला. कुत्रा जोराने भुंकत असल्याने काहीतरी गडबड असल्याची शंका आल्याने एटीममध्ये रोजंदारीवर कामावर असलेल्या साहिद शेख व बाबा सय्यद हे दोघे मामा भाचे बँकेच्या दिशेने जात

दली. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून हुंडेकरी यांनी स्वतःच्या रिव्हाल्व्हर मधून गोळीबार करताच दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले तर त्यांनी दरोड्यात वापरण्यासाठी आणलेल्या दोन गॅस टाक्या व अन्य साहित्य तेथेच टाकून दिले. घटनेची माहिती मिळताच तात्काळ बोधेगाव पोलीस दुरक्षेत्राचे पोहेडकॉ वामन खेडकर,पोना अण्णा पवार, नामदेव पवार, हरी धायतडक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून वरिष्ठांना घटनेची माहिती दिली.

रविवारी सकाळी घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकरे, शेवगाव विभागाचे उपअधीक्षक मंदार जावळे स्थानिक गुन्हा शाखा, श्वान, ठसे तज्ञ पथक दाखल झाले. श्वान लगतच घुटमळले व दरोडेखोर लगतच्या कपाशीच्या शेतातून पलायन केल्याचा पोलिसांचा कयास आहे. पोलिसांनी दरोडेखोरांचे साहित्य ताब्यात घेतले बँकेचे शाखाधिकारी दिगंबर कदरे यांच्या तक्रारी नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांना दरोड्याची माहिती वेळेवर मिळाली, पण पत्ता चुकला !
दरोडेखोरांनी एटीएम मशीन कापण्याचा प्रयत्न सुरू केला. या आधी एटीएमला जोडण्यात आलेले महत्वाचे वायर तोडून ते मशीन संपर्कहीन केले. या कालावधीत दरोडेखोरांचा हा सर्व प्रकार बँक प्रशासनाच्या हैद्राबाद मधील सायबर विभागाला समजताच तेथून शेवगाव पोलिस स्टेशनला कळवण्यात आले. मात्र तेथून देण्यात आलेला बँकेचा पत्ता हा बँकेचा जुना पत्ता असल्याने पोलिसांनी प्रथम जुन्या जागेवर धाव घेतली. मात्र बोधेगाव सेंट्रल बँकेचे नवीन जागेत स्थलांतर होऊन तीन चार वर्षे झाली तरी कागदपत्री जुना पत्ता असल्यामुळे या तांत्रिक चुकीमुळे पोलिसांना दरोडेखोरांपर्यत वेळेवर पोहचता आले नाही.

पाळत ठेवून दरोड्याचा प्रयोग
बोधेगाव येथील सेंट्रल बँकेचे एटीएमची शनिवारी गाडी येऊन तपासणी केली मात्र चोरट्यांचा समज झाला मोठी रक्कम भरणा केल्याचा अंदाज आल्याने नियोजित कट रचून एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला मात्र तो सतर्कतेमुळे असफल झाला आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांना दरोडेखोरांचे धागेदोरे मिळाले नाहीत.

कुत्रे भुंकले नी दरोडा फसला..
बँकेतील रोजंदारीवरील कर्मचारी अकबर सय्यद असून लगतच त्याचे घर आहे तसेच त्यांचा भाचा साहिद शेख हा एटीएमची देखभाल करीत आहे. दोघांसोबत दररोज हा कुत्रा बँकेच्या परिसरात राहतो. त्याचा नित्याचा हा प्रकार आहे. दरोडेखोरांचा रविवारी पहाटे तीन ते साडे चार वाजता एटीएम फोडण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आवाज आल्याने बँकेच्या दारात असलेला पाळीव कुत्रा जोरजोराने भुंकत मालकाच्या घरी गेला. तेथेही कुत्रा जोराने भुंकत असल्याने त्याच्या आवाजाने बाबा सय्यद हे जागे झाले. कुत्रा बँकेच्या दिशेने जोरजोराने ओरडून घुटमळत होता. संशयामुळे दोघे बँकेकडे गेल्याने हा प्रकार उघडीस आला. मुक्या प्राण्यामुळे बँकेची होणारी लूट उघडकीस आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या