Saturday, April 27, 2024
Homeनगरदेशी-विदेशी दारूसह नऊ लाखांचा ऐवज जप्त

देशी-विदेशी दारूसह नऊ लाखांचा ऐवज जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची सुपा येथे कारवाई

अहमदनगर (प्रतिनिधी) – लॉकडाऊनमुळे दारूविक्रीस बंदी असताना चोरी-छुप्या पद्धतीने दारू विक्री होत असल्याचे समोर येत आहे. राज्य उत्पादन शुल्कने केलेल्या कारवाईतून ते अधिकच स्पष्ट झाले आहे. नगर-पुणे महामार्गावर सुपा येथे उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संजय सराफ यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे एका स्कॉर्पियो (क्र. एमएच-16, बीवाय- 2417) वाहनातून विविध ब्रँडची देशी-विदेशी दारू पकडली. ही दारू पारनेर येथून नगरच्या दिशेने आणली जात होती, अशी माहिती अहमदनगर उत्पादन शुल्कचे अधीक्षक पराग नवलकर यांनी दिली.

- Advertisement -

या प्रकरणी आरोपी दीपक अनंत पवार (वय- 39 रा. सुपा ता. पारनेर) याला अटक करण्यात आली आहे. चौदा दिवसांपासून लॉकडाऊन असल्याने तळीराम आता दारूसाठी चांगलेच आसुसले आहेत. याचा गैरफायदा काही महाभाग मूळ किमतीच्या दुप्पट-तिप्पट अधिक दराने दारू विकून घेत आहे. एका स्कॉर्पियो (क्र. एमएच- 16 बीवाय- 2417) वाहनातून नगरच्या दिशेने दारुची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संजय सराफ यांना मिळाली. सिराफ यांनी मंगळवारी रात्री नगर-पुणे महामार्गावर सुपा (ता. पारनेर) येथील हॉटेल सफलतासमोर सापळा लावला.

पथकाने पाठलाग करून स्कॉर्पियोला पकडले. स्कॉर्पियोची तपासणी केली असता यामध्ये देशी दारुच्या 197 बाटल्या, विदेशी दारू मॅकडॉल व्हीस्कीच्या 406 बाटल्या, रॉयल स्टॅग व्हीस्कीच्या 113 बाटल्या, ओसी व्हिस्कीच्या 44 बाटल्या, मॅकडॉल 28 बाटल्या, बिअर 25 बाटल्या अशा एकूण 813 बाटल्या व स्कॉर्पियो मिळून आठ लाख 83 हजार 399 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपआयुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सराफ यांच्यासह आण्णासाहेब बनकर, दुय्यम निरीक्षक विजय सुर्यवंशी, महिपाल धोका, वर्षा घोडे, अरुण जाधव, वाय. बी. मडके, पांडुरंग गदादे यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या