Friday, April 26, 2024
Homeनगरमहाआघाडी सरकारने शेतकर्‍यांची फसवणूक केली

महाआघाडी सरकारने शेतकर्‍यांची फसवणूक केली

भाजप धरणे आंदोलनाप्रसंगी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा आरोप

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांची केलेली फसवणूक आणि सरकारला महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यात येत असलेले अपयश स्पष्टपणे समोर आले आहे. सुरू असलेल्या योजना बंद करून स्वत:चे अपयश झाकणार्‍या या नाकर्त्या सरकारला जाब विचारण्यासाठी भारतीय जनता पार्टीने राज्यभर आंदोलन केले, असल्याचे प्रतिपादन माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले.

- Advertisement -

शेतकर्‍यांची फसवणूक व महिलांवर वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपाच्यावतीने तहसील कचेरीवर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आंदोलकांच्या वतीने नायब तहसीलदार डॉ. ज्योती गुंजाळ यांना माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी निवेदन दिले. यावेळी सुनील रामदासी, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील वाणी, ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत कडुस्कर, आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबन मुठे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य गणेश राठी, माजी शहराध्यक्ष मारुती बिंगले, माजी तालुकाध्यक्ष अनिल भनगडे, वाहतूक आघाडीचे सुनील मुथा, विष्णुपंत डावरे, पत्रकार मिलिंदकुमार साळवे, पुरुषोत्तम भराटे, रुपेश हरकल, प्रफुल्ल डावरे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी भरत साळुंके, रवींद्र खटोड, विशाल अंभोरे, भाजप युवा मोर्चाचे विशाल यादव, अक्षय वर्पे, अ‍ॅड. प्रवीण लिप्टे, अजित बाबेल, दीपक दुग्गड, अरुण धर्माधिकारी, अरुण शिंदे, संतोष हारगुडे, गणेश अभंग, रवि पंडीत, अक्षय नागरे, अभिजीत राका, विश्वनाथ गवळी, महेश खरात, अविनाश काळे, मुकुंद लबडे, राकेश कुंभकर्ण, बबन साळुंके, गणी सय्यद, सनी यादव, नितीन यादव, रामेश्वर बेंद्रे, शैलेश विघे, बंटी अढांगळे, योगेश ओझा, पंकज ललवाणी, बाबुलाल शर्मा, नीलेश गिते, रामदास सलालकर, अजय जनवेजा, बाळासाहेब हरदास, जय पाटील, तेजस पाथरकर, रामेश्वर बेंद्रे, सागर ढवळे, डॉ. ललित सावज, गौरव देवरे, अजय यादव, सर्वेश यादव, सागर यादव, किशोर महापुरे, गणेश फुलभाटी, अशोक गवते, संजय भिंगारे, मुकुंद लबडे, किशोर राणा, अविनाश काळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या