Thursday, April 25, 2024
Homeनगरराहात्यात विडीच्या तुकड्याने पेटली गाडी

राहात्यात विडीच्या तुकड्याने पेटली गाडी

राहाता (तालुका प्रतिनिधी)- राहाता येथील खंडोबा चौकात दुरूस्ती करत असणार्‍या दुचाकीने पेट घेतल्याने दुचाकीचे मोठे नुकसान झाले. वेळीच आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. खंडोबा चौकालगत बाभळीच्या झाडाखाली एक फिटर भर दुपारी स्कुटी दुरूस्तीचे काम करत असताना तिथे सांडलेल्या ऑईलवर अज्ञात इसमाने विडीचा तुकडा टाकल्याने ऑईलने पेट घेतला.

जवळच उभ्या असलेल्या दुचाकीने पेट घेतल्याने तिचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत पाण्याचा मारा करत आग विझविली तर या गाडीलगत उभ्या असलेल्या अनेक दुचाकी व रिक्षा बाजूला केल्याने मोठ्या अनर्थाबरोबर आर्थिक हानीही टळली. या घटनेनंतर याठिकाणी मोठी गर्दी झाली होती.

- Advertisement -

ऑईलने पेट घेतला. त्यानंतर आग भडकत जाऊन, गाडीने देखील पेट घेतल्याने एकच गोंधळ उडाला. आग अधिक भडकल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आजूबाजूला अनेक वाहने उभी असल्याने तसेच रहिवाशी परिसर असल्याने नागरिकांनी तातडीने पाणी टाकून आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या आगीत दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या