भिंगारमधून 20 हजारांचे टायर चोरले
Featured

भिंगारमधून 20 हजारांचे टायर चोरले

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी ) – भिंगारमधील गवळी वाड्याजवळ मोकळ्या जागेत ठेवलेले 20 हजार रूपये किंमतीचे जे.के. कंपनीचे टायर अज्ञात चोरट्याने चोरून नेले. ही घटना शनिवार (दि. 15) ते मंगळवार (दि. 18) दरम्यानच्या काळात घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

उत्तम रंगनाथ डोईफोडे (वय- 29 रा. दिल्ली गेट) यांनी गवळीवाड्याजवळ असलेल्या मोकळ्या जागेमध्ये टायर ठेवले होते. शनिवार ते मंगळवार या दरम्यान चोरट्यांनी ते लंपास केले. टायरची चोरी झाल्याचे डोईफोडे यांच्या मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता लक्षात आले. डोईफोडे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक खेडकर करत आहेे.

Deshdoot
www.deshdoot.com