नगर: सिटी बससाठी भिंगारकरांचा टाहो..
Featured

नगर: सिटी बससाठी भिंगारकरांचा टाहो..

Sarvmat Digital

वंचित बहुजन आघाडीचे महापालिकेसमोर निदर्शने

भिंगार – भिंगारमधील नागरिकांसाठी महापालिकेने सिटी बस सुरू करावी यासाठी वंचित बहुजन आघाडीने आज महापालिकेसमोर निदर्शने केली. पंधरा दिवसांत निर्णय घ्या अन्यथा नगर शहरात रास्तारोको करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. महापालिकेचे उपायुक्त सुनील पवार यांना मागणीचे निवेदन आंदोलकांनी दिले.

भिंगारच्या नागरिकांना नगर शहरांमध्ये येण्या-जाण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागते. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व महिलांची गैरसोय होते. भिांगरमध्ये सिटी बस सुरू झाली त्याला प्रतिसाद मिळून महापालिकेला आर्थिक उत्पन्न मिळू शकते. कॉलेज विद्यार्थी-विद्यार्थिनाही सोईस्कर होईल. भिंगारमधून नगर शहरात येण्यासाठी रिक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही. रिक्षाचालक कधीकधी अरेरावीची भाषा करत जास्त पैसे उकळतात.

सिटी बस सुरू झाल्यास नागरिकांची आर्थिक लूट होणार नाही आणि भिंगारकरांची लूटही थांबेल. पंधरा दिवसात सिटी बस सुरू करा अन्यथा वंचित बहुजन आघाडी नगर शहरातील इप्रियल चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर रास्त रोको करेल असा इशारा यावेळी देण्यात आला.

वंचित बहुजन आघाडीचे सुनील शिंदे, सागर चाबुकस्वार, सागर भिंगारदिवे, विनोद गायकवाड, दिलीप साळवे, सागर ठोकल, योगेश थोरात, संदीप गायकवाड, हनीफ शेख, भूषण कांबळे, नागेश पाथरीया, अक्षय पाथरीया, सिद्धार्थ घोडके, सागर गायकवाड, अक्षय गायकवाड, बाळासाहेब भिंगारदिवे, ऋषिकेश गायकवाड, अभिषेक शेलार, विलास साळवे, सुमित भिंगारदिवे, संतोष धीवर, मनोज भिंगारदिवे, समर्थ भिंगारदिवे, गणेश पंडित यावेळी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com