लाईटची लपाछपी, भिंगारकर घामाघूम
Featured

लाईटची लपाछपी, भिंगारकर घामाघूम

Sarvmat Digital

वीज सुरळीत करण्यासाठी काँग्रेस छेडणार आंदोलन

अहमदनगर (प्रतिनिधी) – गत आठवड्यातील वादळ वार्‍यात झालेल्या नुकसानीमुळे भिंगारमध्ये विजेची लपाछपी सुरू असल्याने उकाड्याने नागरिक घामाघूम होत आहेत. काँग्रेसने याकडे वीज वितरण कंपनीचे लक्ष वेधले असून वीज पुरवठा त्वरित सुरळीत करावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

भिंगार काँग्रेसचे अध्यक्ष व कॅन्टोंमेंट बोर्डचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड.आर.आर.पिल्ले यांनी वीज वितरण शहर उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता एम.एस.देशमुख यांची काल शुक्रवारी भेट घेत भिंगारमधील विजेची समस्या मांडली. पिल्ले यांच्यासह भिंगारचे शिष्टमंडळ तेथे पोहचले त्यावेळी देशमुख तेथे नव्हते. पिल्ले यांनी मोबाईलवर देशमुख यांच्याशी संपर्क करत भिंगारचे गार्‍हाणे मांडले. तातडीने लक्ष घालून भिंगारचा वीज पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा भिंगार शहर काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही अ‍ॅड. पिल्ले यांनी यावेळी दिला.

अधिकार्‍यांनी केले आश्वस्त
झाड पडणे, वार्‍याचा वेग आदिंमुळे भिंगार शहर परिसरात वीज पुरवठा कमी झाला असला तरी यात बदल करुन पुर्ववत वीज पुरवठा सुरळीत करु असे आश्वासन कार्यकारी अभियंता देशमुख यांनी यावेळी दिले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com