भंडारदरा पाणलोटात पावसाचा पुन्हा जोर
Featured

भंडारदरा पाणलोटात पावसाचा पुन्हा जोर

Sarvmat Digital

भंडारदरा (वार्ताहर)- उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा पाणलोटात काल मंगळवारी 4 वाजल्यापासून पावसाने जोर धरल्याने धरणात नव्याने 28 दलघफू पाणी दाखल झाले. दुपारी 4 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत झालेल्या मुसळधार पावसाची नोंद 21 मिमी झाली आहे. धरणातील पाणीसाठा 3625 दलघफू झाला आहे. 34 दलघफू पाण्याचा वापर झाला आहे.

निळवंडे धरणातही हळूहळू आवक सुरू आहे. काल सकाळी या धरणातील पाणीसाठा 3544 दलघफू साठा आहे. भंडारदरा धरणातून विद्युत क्रं.1 साठी 800 क्युसेकनेपाणी सोडण्यात येत आहे. तर निळवंडेतून उन्हाळी आवर्तनासाठी 1200 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. कुकडीतील डिंभे धरणात 3014 दलघफू पाणीसाठा आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत नोंदवला गेलेला पाऊस 17, रतनवाडी 6, पांजरे 7, वाकी 6.

आंबित ओव्हरफ्लो

यंदा 20 दिवस अगोदर भरले

कोतूळ (वार्ताहर)- मुळा नदीच्या उगमस्थान परिसरात पाऊस सुरू असल्याने नदीवरील पहिले आंबित धरण काल मंगळवारी सकाळी ओव्हरफ्लो झाले आहे. 193 दलघफू क्षमतेचे हे धरण गेल्यावर्षी 28 जूनला ओव्हरफ्लो झाले होते. त्यामुळे 150 क्युसेकने पाणी नदीत झेपावले आहे.

हरिश्चंद्रगडाच्या पर्वत रांगांतील कुमशेतच्या आजोबा पर्वतात उगम पावणार्‍या मुळा नदीवर आंबित गावाच्या वरील बाजूस पाटबंधारे विभागाच्यावतीने दगडी तलाव बांधला आहे. पावसाळ्यात पहिल्याच पावसात दरवर्षी आंबित धरण सुरूवातीलाच भरून वाहू लागतो. यावर्षी चक्रीवादळ सोबतीला पाऊसही घेऊन आला. चार दिवसांपासून पाऊस सुरू झाल्याने मान्सून येण्यापूर्वीच हे धरण ओव्हरफ्लो झाले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com