भगवानबाबांची रायफल चोरीला
Featured

भगवानबाबांची रायफल चोरीला

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी) – मराठवाड्याचे शक्तीपीठ भगवानबाबा गडावरून बाबांची वापरती रायफल आणि तलवार चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार आज गुरूवारी सकाळी समोर आला. चोरीची माहिती समजताच पाथर्डी पोलीस गडावर दाखल झाले असून तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात भगवानबाबा गड बांधण्यात आला आहे. राज्यभरात बाबांचा मोठा भक्त परिवार आहे. भक्तांना बाबांच्या वापरातील वस्तूंचे दर्शन घेता यावे, यासाठी गडावर संग्रहालय आहे. या संग्रहातील शो-केसमध्ये ठेवण्यात आलेली भगवानबाबांची तलवार आणि बंदुकीचा सांगाडा चोरीला गेल्याची तक्रार पाथर्डी पोलिसांत दाखल झाली आहे.

या घटनेमुळे भगवानबाबांच्या समर्थकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पाथर्डी पोलिस ठाण्याचे पीएसआय राठोड हे तातडीने घटनास्थळी गडावर दाखल झाले. तेथील सीसीटीव्ही फुटेज ते तपासणी करत असल्याचे समजते. या चोरीने भगवान गडावरील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com