भगतसिंग चौकातील मारहाण प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल
Featured

भगतसिंग चौकातील मारहाण प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल

Sarvmat Digital

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – शहरातील भगतसिंग चौकात शनिवारी पहाटे झालेल्या मारहाण प्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात युवराज वाघ (वय 19, धंदा-मजुरी, रा. भगतसिंग चौक, जुनी घासगल्ली वॉर्ड नं 6, श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अनिकेत फुलपगार, प्रथमेश जगताप, अनिकेत दाभाडे, राजेश पाटील, मंगेश जगताप, सनी जाधव, श्रीकांत महंकाळे, उद्देश मुंडलिक, करण चव्हाण यांच्यासह इतर पाच ते सहा अनोळखी इसम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे, शनिवारी पहाटे भगतसिंग चौकात नऊ ते दहा जणांनी संगनमत करून आपल्याला लाथाबुक्यांनी, लाकडी दांडक्याने, लोखंडी पाईपने मानेवर, पोटावर मारुन जखमी केले. तर भांडण सोडवण्यास आलेल्या मित्रासही लाकडी दांड्याने व लोखंडी पाईपने हातावर, नाकावर, कपाळावर मारहाण करून जखमी केले व जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत पुढील तपास सहायक फौजदार मुसळे करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com