एटीएममधून 2 हजाराची नोट होणार गायब
Featured

एटीएममधून 2 हजाराची नोट होणार गायब

Sarvmat Digital

नवी दिल्ली – एटीएम मशीन्समध्ये लवकरच एक महत्वाचा बदल होणार आहे. त्यामुळे यापुढे तुम्हाला एटीएम मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटा काढता येणार नाहीत. देशभरातील दोन लाख 40 हजार एटीएममधून दोन हजार रुपयाच्या नोटेचा रँक हटवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

त्यामुळे यापुढे एटीएममधून 100, 200 आणि 500 रुपयाच्याच नोटा निघतील. एटीएम मशीनमध्ये चार ट्रे असतात. त्यातल्या तिघांमध्ये 500 आणि एकात 100 किंवा 200 रुपयाच्या नोटा ठेवल्या जाणार आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com