नगर महापालिकेत दोन परिविक्षाधीन
Featured

नगर महापालिकेत दोन परिविक्षाधीन

Sarvmat Digital

सिनारे व लांडगे यांची सहायक आयुक्तपदी नियुक्ती

अहमदनगर ( प्रतिनिधी ) – राज्य सरकारच्या कृपेमुळे महापालिकेला आता दोन सहायक आयुक्त मिळाले आहे. परिविक्षाधीन प्रशिक्षणार्थी म्हणून दिनेश संपत सिनारे आणि संतोष भिमराज लांडगे यांची नगर महापालिकेत सहायक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यभरात असे 61 अधिकारी नियुक्त केले आहेत.

मुख्याधिकारी (वर्ग ब) या श्रेणीतील हे अधिकारी आहेत. महापालिकेत प्रभाग अधिकारी पदे या श्रेणीतील आहेत. मात्र त्या श्रेणीतील अधिकारी नसल्याने महापालिकेच्याच कर्मचार्‍यांना तेथे नियुक्त करण्यात आले होते. या दोन अधिकार्‍यांमुळे महापालिकेला तेवढा दिलासा मिळाला आहे. एकीकडे अगोदरच आहे त्या अधिकारी, कर्मचार्‍यांचे पगार वेळेवर होत नाही. त्यासाठी पैसे उभे करताना नाकीनाऊ येत आहे. त्यातच हे नवीन दोन अधिकारी आल्यामुळे आणखी बोजा वाढेल, हे खरे असले, तरी दुसरीकडे यामुळे वसुलीकडे लक्ष द्यायला स्वतंत्र अधिकारी मिळाले, हे दिलासादायक ठरणारे आहे.

आता तांत्रिक कर्मचार्‍यांची प्रतीक्षा
परिविक्षाधीन का होईना दोन प्रशासकीय अधिकारी मिळाले असले, तरी महापालिकेने मागणी केलेल्या तांत्रिक कर्मचार्‍यांच्या नियुक्तीची अद्याप प्रतिक्षा आहे. शहर अभियंता पूर्णवेळ नाही. शिवाय अभियंतासारखी महत्त्वाची पदे रिक्त असल्याने ती पदे भरण्यासाठी परवानगी नसल्याने त्याचा परिणाम थेट विकास कामांवर होत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com