Saturday, April 27, 2024
Homeनगरआश्वीत हाय अलर्ट, नागरीक होम क्वारंटाईन

आश्वीत हाय अलर्ट, नागरीक होम क्वारंटाईन

आश्वी (वार्ताहर) – संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे कोराना विषाणू बाधीत 1 रुग्ण आढळून आल्याने परिसरात ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पंचक्रोशीतील गावांमध्ये 100 टक्के लॉकडाऊन करण्यात आले आहे. नागरीकानी ही स्वतः ला स्वयंस्फूर्तीने होम कोरोनटाईन केल्याचे चित्र आहे. तर आश्वी बुद्रक याठिकाणी 128 जणांना होम क्वारंटाईन केल्याची माहिती मिळाली आहे.

याबाबत निमगावजाळी आरोग्य केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार 31 मार्च रोजी आश्वी परिसरातील 3 संशयित रुग्णांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले होते. त्यापैकी एका व्यक्तीला कोराना विषाणूची लागण झाल्याचे निदान तपासणी अहवालात झाले आहे. त्यामुळे त्या बाधीत व्यक्तीच्या कुटुंबातील 15 जणांना गुरुवारी रात्री तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या संपर्कातील आश्वी परिसरातील इतर 15 लोकांना ही तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

- Advertisement -

ही बाधीत व्यक्ती राहत असलेला परिसर पुर्णपणे बंद करण्यात आला असून संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवण्यासाठी एक कर्मचार्‍याची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच या परिसरात प्रतिबंधात्मक औषध फवारणीसह उपाय योजना करण्यात आल्या आहेत. आश्वी बुद्रक याठिकाणी 128 जणांना होम क्वारंटाईन केले असून 22 जणांना तपासणीसाठी पाठवले आहे. त्यापैकी 16 जणांचा अहवाल येणे बाकी असल्याची माहिती मिळाली आहे.

आश्वी खुर्द आरोग्य केंद्राकडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार परिसरातील आश्वी, पानोडी, शेडगाव, पिप्री आदी गावातील 83 संशयितांना होम क्वारंनटाईन केले असून त्यामध्ये परदेशातून आलेल्या एका नागरिकाचा समावेश आहे. तर दोघांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तसेच आश्वी येथील कोरोना विषाणू बांधीत व्यक्तीच्या संपर्कातील आश्वी खुर्द येथील नागरिकांची माहिती व शोध घेण्याचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान प्रशासनाने 188 कलम लागू असल्याने आश्वी परिसरातील 28 गावे नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद करत गावातील प्रवेश करण्यासाठीचे रस्ते, गल्ली व चौफुल्यावर लाकडी ओंडके टाकून, बाबू व दगड लावून बंद केले असून अत्यावश्यक सेवा देणार्‍यांनीही दक्षता म्हणून आपली दुकाने बंद केली आहेत.

यावेळी परिसरातील गावानमध्ये आश्वीचे पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर व त्याचे सर्व सहकारी गस्त घालत आहेत. आरोग्य विभागाचे कर्मचारी, स्थानिक सरपंच, सदस्य, दक्षता कमिटी, राजकीय पुढारी नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचे व काळजी घेण्याचे आवाहन करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या