अरणगाव जवळ महिलेला ट्रकने चिरडले
Featured

अरणगाव जवळ महिलेला ट्रकने चिरडले

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी)- दौंड महामार्गावरील अरणगाव बायपासजवळ अपघात झाला आहे. भरधाव ट्रकने एका वृद्ध महिलेला चिरडले आहे. यामध्ये इंदुबाई सखाराम शिंदे (वय 70) ही महिला जागीच ठार झाली आहे.

आरणगाव जवळील बायपास चौकातील नाटवस्ती नजीक हा अपघात पहाटे साडेसहा वाजता झाला. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले.

अरणगाव परिसरात गेल्या दीड महिन्यापासून अपघातांची मालिका सुरूच आहे. यामुळे गाव आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये अपघाताबाबत काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com