पालघर प्रकरणी जातीचे राजकारण करू नका ; गृहमंत्र्यांचे आवाहन
Featured

पालघर प्रकरणी जातीचे राजकारण करू नका ; गृहमंत्र्यांचे आवाहन

Sarvmat Digital

मुंबई – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज फेसबुक द्वारे राज्याला संबोधित केले. काही लोक पालघर प्रकरणी राजकारण करत असून ताब्यात घेतलेल्या १०१ लोकांमध्ये एकही मुस्लिम नसून पालघर प्रकरणावर कोणीही जातीचे राजकारण करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

एकीकडे संपूर्ण देश कोरोनाविरूद्ध लढाई देत असताना पालघरला अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. पालघरची घटना घडल्यानंतर ८ तासात १०१ जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. तसेच या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी संचारबंदी मध्ये महाबळेश्वर येथे गेलेले वाधवान कुटुंबाचा क्वॉरन्टाईनचा पीरियड संपत असून आम्ही सीबीआयला पत्र लिहून वाधवान कुटुंबाला त्यांच्या ताब्यात घेण्याची विनंती केली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे..

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com