नगर : बोगस नळधारकांसाठी महापालिकेचा स्पेशल ड्राईव्ह
Featured

नगर : बोगस नळधारकांसाठी महापालिकेचा स्पेशल ड्राईव्ह

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी) – बोगस घेतलेले नळ कनेक्शन अधिकृत करून मालकी देण्याचा स्पेशल ड्राईव्ह महापालिकेने सुरू केला आहे. पावणेसहा हजार रुपये भरून बोगस नळ अधिकृत केला जाणार असून त्यासाठी 31 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

महापालिकेच्या हद्दीत अनेकांनी बोगस नळ कनेक्शन घेतले आहेत. 1 मार्च ते 31 मार्च या काळात बोगस नळ कनेक्शन अधिकृत करण्याची मोहीम महापालिकेने सुरू केली आहे. चालू वर्षाची पाणीपट्टी, महापालिका शुल्क, 2 हजार रुपये दंड आणि दीड हजार रूपये डिपॉझिट असे 5 हजार 700 रुपये भरून नळाचे अधिकृत मालक होण्याची संधी महापालिकेने नगरकरांना उपलब्ध करून दिली आहे. घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक तिन्ही प्रकारचे नळ कनेक्शन अधिकृत केले जाणार आहेत.

एप्रिलपासून कारवाई
महापालिका बोगस नळांची शोध मोहीम सुरू करणार आहेत. बोगस नळ असणार्‍यांवर दंडात्मक कारवाईसोबतच कायदेशीर तरतुदीनुसार कारवाई केली जाणार आहे. ही संधी समजून बोगस नळ अधिकृत करावे असे आवाहन महापालिकेने केले आहे. शंकांचे निरसन करण्याकरीता पाणी पुरवठा विभाग, प्रभाग अधिकारी आणि प्रभाग अभियंता यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com