महापालिकेतील पिचकारी पडेल महागात
Featured

महापालिकेतील पिचकारी पडेल महागात

Sarvmat Digital

महापौरांनी दिले दंडात्मक कारवाईचे आदेश

अहमदनगर (वार्ताहर) – सध्या स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. स्वच्छता सर्वेक्षण समिती येणार असल्याने परिसरात स्वच्छता आवश्यक आहे. मनपा परिसरात जर कोणी थुंकताना आढळल्यास तातडीने कारवाई करा, असा आदेश महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिला. महापालिकेत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी उपायुक्त प्रदीप पठारे, आस्थापना प्रमुख मेहेर लहारे, प्रसिद्धी अधिकारी दिगंबर कोंडा, राजेश लयचेट्टी, किशोर कानडे, सोनू चौधरी आदी उपस्थित होते. स्वच्छ सर्व्हेक्षण 2020 अंतर्गत समिती पाहणीसाठी येणार आहे. मनपाचा परिसर स्वच्छ राहण्याच्या दृष्टीने परिसरात कोणी थुंकल्यास दंडात्मक कारवाई करा, असे महापौरांनी सांगितले.

सर्व कर्मचार्‍यांनी ओळखपत्र लावणे आवश्यक आहे कामावर आल्यावर व जाताना बायोमेट्रीक पद्धतीने हजेरी नोंदवावी. उशिरा येणार्‍या व कामचुकार कर्मचार्‍यांवर कारवाई करा, अशा सुचनाही महापौर वाकळे यांनी या बैठकीत संबंधितांना दिल्या.

Deshdoot
www.deshdoot.com