Friday, April 26, 2024
Homeनगरनगर : नाल्याच्या सफाईत ठेकेदाराची मनमानी

नगर : नाल्याच्या सफाईत ठेकेदाराची मनमानी

गणेश भोसले । ..तर महापालिका जबाबदार

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील नालेसफाईचे काम पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे असतानाही ठेकेदाराने मनमानीने काम बंद ठेवले. आता पावसाळा सुरू झालाय तरीही नालेसफाई अपुरीच असल्याचा आरोप नगरसेवक गणेश भोसले यांनी केला आहे. गटारी, नाले तुंबले तर ते पाणी नागरिकांच्या घरात घुसेल. शहरात पुरस्थिती निर्माण असेल तर त्याला महापालिका प्रशासन जबाबदार असेल, असे भोसले यांनी महापालिकेला कळविले आहे.

- Advertisement -

शहरात 21 ओढे-नाले आहेत. या शिवाय शहराअंतर्गत गटारीही आहेत. या गटारींची सफाई करण्याचा ठेका महापालिकेने ठेकेदाराला दिला आहे. पावसाळा सुरू झाला तरी ही सफाई वेळेत न झाल्याने शहरात पूर स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पूर स्थिती निर्माण झाल्यास त्यास महापालिका व संबंधित ठेकेदार जबाबदार राहील, असे नगरसेवक गणेश भोसले यांनी महापालिका प्रशासनाला कळविले आहे.

नगरसेवक गणेश भोसले यांनी महापालिका प्रशासनाला वेळोवेळी निवेदने दिली होती. तरीही वेळेवर नाले-सफाईचे काम झाले नसल्याचा आरोप नगरसेवक गणेश भोसले यांनी केला आहे. महाराष्ट्रात व नगर शहरात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. पहिल्याच मोठ्या पावसात महापालिकेच्या नालेसफाई कामाची पोलखोल होण्याची शक्यता आहे. गेल्या वषीर्ही पहिल्याच पावसात शहरातील काही भागात पूर स्थिती निर्माण झाली होती. त्या स्थितीची पुनरावृत्ती होऊ शकते. त्यामुळे महापालिकेने पूरस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे नगरसेवक भोसले यांनी महापालिका प्रशासनाला कळविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या