Saturday, April 27, 2024
Homeनगरबंधूच्या मृत्यूचे दु:ख विसरून मनपा आयुक्तांचा करोना विरोधात लढा

बंधूच्या मृत्यूचे दु:ख विसरून मनपा आयुक्तांचा करोना विरोधात लढा

सख्या भावाच्या अंत्यविधाला जाणे टाळत : नगरकरांसाठी बजावताहेत कर्तव्य

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांचे मोठे बंधू चंद्रकांत मायकलवार (वय 65) यांचे सोलापूर येथे हृदयविकाराने निधन झाले आहे. सख्खा भाऊ गेल्याची वार्ता समजली पण त्याच वेळी नगर शहरात एकाच दिवसात 5 कोरोना बाधित रुग्ण आढळल्याचे समजल्यावर शहरातील जनतेची काळजी घेणे महत्वाचे असा विचार करत त्यांनी भावाच्या अंत्यविधीला जाण्याऐवजी नगरकरांना सुरक्षा पुरविण्यास प्राधान्य दिले आहे. भावने पेक्षा कर्तव्य श्रेष्ठ याची प्रचिती आयुक्त मायकलवार यांनी नगरकरांना दाखविली आहे.

- Advertisement -

नगर महापालिकेचा आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर 16 मार्चपासून मायकलवार घरी गेलेले नाहीत. करोनामुळे 19 मार्च पासून नगर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश व त्यानंतर संपूर्ण देशात लॉकडाऊन झालेले आहे. तेव्हापासून आयुक्त मायकलवार हे नगर कर्तव्य बजावत आहेत. त्यांचा परिवार सोलापूर येथे आहे. मात्र, 2 महिन्यापासून ते परिवारापासून दूर आहेत.

शहरात सुभेदार गल्लीत मंगळवारी (दि. 12) एक महिला कोरोनाबाधित आढळली होती. त्यानंतर महापालिकेने परिसरातील नागरिकांचे घशातील स्राव तपासणीसाठी पाठविले होते. त्यांतील काही अहवाल बुधवारी (दि.13) प्राप्त झाले. यात आणखी चार जण कोरोनाबाधित असल्याचे आढळले. तसेच सारसनगर भागातही एक व्यक्ती कोरोना बाधित आढळली.

यामुळे महापालिका प्रशासनाची धावपळ सुरु असताना आयुक्त मायकलवार यांना सोलापूरहून कुटुंबातील व्यक्तीचा फोन आला आणि त्यांचे मोठे बंधू चंद्रकांत मायकलवार (वय 65) यांचे सोलापूर येथे हृदयविकाराने निधन झाले आहे, अशी माहिती दिली. त्यावेळी कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या परिसरात काय उपाययोजना करायच्या याबाबत आयुक्त मायकलवार हे विविध अधिकार्‍यांशी चर्चा करत होते.

ही माहिती समजल्यावर बंधूच्या अंत्यविधीला जाणे आवश्यक असतांना घर आणि कुटुंबासोबतच कर्तव्यही तेवढेच महत्वाचे. नगर शहरच माझे कुटुंब आहे. त्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, अशी सूचना देत, सख्या भावाच्या अंत्यविधीला न जाता नगरकरांसाठी कर्तव्य बजावण्याचा निर्णय घेतला. यातून नगरकरांनी बोध घेवून शहराचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या