महापालिकेच्या आयुक्तपदी श्रीकांत मायकलवार
Featured

महापालिकेच्या आयुक्तपदी श्रीकांत मायकलवार

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिका आयुक्तपदी सोलापूर महापालिकाचे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

श्रीकृष्ण भालसिंग निवृत्त झाल्यानंतर ही जागा रिक्त होती. डिसेंबरपासून मनपा आयुक्तपदाचा कार्यभार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे होता.

महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळावा यासाठी प्रयत्न सुरू होते. शासनाने शुक्रवारी मायकलवार यांची नियुक्ती करून या विषयावर पडदा टाकला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेली नियुक्ती आणि मार्चअखेर वसुली वाढविणे ही महत्त्वाचे आव्हाने मायकलवार यांच्यासमोर असतील.

अजूनही आशाावादी
अजय चारठाणकर यांनी नगर महापालिकेत उपायुक्त म्हणून कामकाज पाहिले आहे. ते पुणे शहरबससेवेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. नगरला आयुक्त म्हणून येण्यास ते इच्छुक असून मध्यंतरी ते आ.संग्राम जगताप यांची भेट घेऊन गेल्याची चर्चा आहे. चारठाणकर यांच्या नियुक्तीसाठी आ. जगताप यांनी पत्र दिल्याचे समजते. मायकलवार नगरला रुजू होण्यापूर्वीच बदली आदेश रद्द होऊन चारठाणकर यांच्यासाठी ‘वजन’ वापरले जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com