महापालिका पोटनिवडणुकीत अवघे 31 टक्के मतदान
Featured

महापालिका पोटनिवडणुकीत अवघे 31 टक्के मतदान

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सहा (अ) मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत अवघे 31 टक्के मतदान झाले आहे. उद्या सकाळी महापालिकेच्या जुन्या कार्यालयात मतमोजणी होणार आहे.

सारिका भुतकर यांचे नगरसेवकपद जात प्रमाणपत्र फेटाळल्याने रद्द झाले होते. त्यामुळ या प्रभागात पोटनिवडणूक झाली. यासाठी गुरुवारी मतदान झाले. या प्रभागात एकूण 13 हजार 621 मतदार आहेत. तसेच मतदानासाठी 16 केंद्रांत व्यवस्था करण्यात आली होती.
पोटनिवडणूक असल्याने मतदारांनी सुरुवातीपासूनच मतदानाकडे पाठ फिरविल्याची स्थिती होती. शिवसेना आणि भाजपचे नेते व कार्यकर्ते दिवसभर प्रभागात मतदारांना आवाहन करत असले तरी मतदारांमध्ये मात्र निरुत्साहच होता. एकूण मतदानाची आकडेवारी सरासरी 31 टक्के झाली.

उद्या सकाळी साडेदहा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत मतमोजणी होणार आहे. ही मतमोजणी महापालिकेच्या जुन्या कार्यालयातील आयुक्तांच्या दालनात होणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com