Wednesday, April 24, 2024
Homeनगरनगर : उद्या मतदान, परवा निकाल

नगर : उद्या मतदान, परवा निकाल

पोटनिवडणूक । सेना-भाजपची प्रतिष्ठा पणाला

मतदार- 13621, मतदान केंद्र- 16, कर्मचारी- 100, मतमोजणी शुक्रवारी स. 10 वाजेपासून

- Advertisement -

अहमदनगर ( प्रतिनिधी ) – महापौरांची प्रतिष्ठा अन् शिवसेनेचे अस्तित्व विशद करणार्‍या महापालिका पोटनिवडणुकीसाठी उद्या गुरूवारी मतदान होत आहे. 13 हजार 621 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शुक्रवारी सकाळी दहा वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.

सेनेच्या सारीका भूतकर यांचे नगरसेवक पद जात प्रमाणपत्र सादर न केल्याचे रद्द झाले आहे. रिक्त झालेल्या या राखीव जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. सेनेच्या अनिता दळवी आणि भाजपच्या पल्लवी जाधव यांच्यात सरळ लढत होत आहे. सावेडीतील सहा नंबर वार्डातील 13 हजार 621 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 16 मतदान केंद्रावर सकाळी साडेसात वाजेपासून मतदानाला सुरूवात होणार आहे. त्यासाठी शंभर कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

दुसर्‍या दिवशी शुक्रवारी सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीस सुरूवात होणार आहे. जुन्या महापालिकेत ही मतमोजणी होऊन लगेचच निकाल जाहीर केला जाणार आहे. महापौर बाबासाहेब वाकळे प्रतिनिधीत्व करत असलेल्या या वार्डात ही पोटनिवडणूक होत असून ही जागा राखण्यासाठी महापौर वाकळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दुसरीकडे सेनेला ही जागा कायम राखत अस्तित्वाची झलक दाखवयाची असल्याने दोघांचाही कस लागला आहे.

मतदानासाठी दोन तास सुट्टी
   मतदान करण्यासाठी खासगी व सरकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांना दोन तासाची सुट्टी कलेक्टरांनी जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कलेक्टरांनी ही सुट्टी जाहीर केली आहे. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी खासगी व सरकारी अस्थापनेवरील कर्मचार्‍यांना दोन तासाची सवलत देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या