महानगरपालिका : गटनोंदणी झाली, आता सभेची प्रतीक्षा
Featured

महानगरपालिका : गटनोंदणी झाली, आता सभेची प्रतीक्षा

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी) – सावेडी पोटनिवडणुकीनंतर नव्या नगरसेवकांसह भाजपची गटनोंदणी आज पूर्ण झाली. आता स्थायी समिती सदस्य नियुक्तीच्या सभेची प्रतीक्षा नगरकरांना लागून आहे. नव्या गटनोंदणीनुसार भाजपचे मुल्यांकन वाढले तर सेनेचे घटल्याने सभापती निवडीतही चुरस पहावयास मिळणार आहे.

सावेडीतील सहा नंबर वार्डातील राखीव जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या पल्लवी दत्तात्रय जाधव विजयी झाल्या. महापालिकेत भाजपचे पूर्वी 14 नगरसेवक होते, जाधव यांच्या विजयाने भाजप 15 वर पोहचली. सेनेचे 23, राष्ट्रवादीचे 18, काँग्रेस 5, बसप 4 आणि सपा, अपक्ष असे नगरसेवकांचे बलाबल महापालिकेत आहे. या बलानुसार स्थायी समिती सदस्यांचे मुल्यांकन काढण्यात आले.सेनेचे 6, राष्ट्रवादीचे पाच, भाजपचे तीन आणि काँग्रेस, बसपाचा प्रत्येकी एक सदस्य स्थायीत नियुक्त केला गेला. पोटनिवडणुकीनंतर सेचेची जागा कमी झाल्याने हे गणित बदलणार आहे. फेरमुल्यांकनानुसार भाजपचे मुल्य वाढले तर सेनेचे घटले आहे.

दुसर्‍या टप्प्यातील मुल्यांकनानुसार सेनेचे आता पाच सदस्यच स्थायी समितीमध्ये नियुक्त होणार असून भाजपची संख्या एकने वाढणार असल्याचे सांगण्यात आले. गटनोंदणीनंतर आता स्थायी समिती सदस्य नियुक्तीसाठी सभा काढण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे समजते.

Deshdoot
www.deshdoot.com