Jio ला टक्कर देण्यासाठी Airtel च्या मदतीला Amazon ?
Featured

Jio ला टक्कर देण्यासाठी Airtel च्या मदतीला Amazon ?

Sarvmat Digital

दिल्ली – करोनाच्या संकट काळात भारतीय टेलिकॉम कंपन्यांकडे अनेक गुंतवणूकदार वळत आहे. टेलिकॉम क्षेत्रातील अग्रेसर कंपनी जियोमध्ये आतापर्यंत ८८ हजार करोडची गुंतवणूक झाली आहे. यातच जीयोला टक्कर देण्यासाठी जगातील प्रसिद्ध कंपनी अमेझॉन एअरटेल मध्ये १५ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची चर्चा सध्या बाजारात चालू आहे.

या आधी अबू धाबीच्या मुबाडला या कंपनीने जियोमध्ये जवळपास ९००० कोटींची गुंतवणूक करून शेअर्स विकत घेतले आहे. याच पार्श्वभूमीवर अमेझॉन एअरटेल मध्ये गुंतवणूक करणार असल्याच्या चर्चा बाजारात चालू आहे. गेल्या वर्षात शेअर्स बाजारात एअरटेलच्या शेअर्सची किंमत २६ टक्के वाढली आहे. एअरटेलची ही प्रगती बघता भविष्यात एअरटेल मध्ये गुंतवणूकदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Deshdoot
www.deshdoot.com