आलमगीर येथील 31 वर्षीय करोना बाधीत रुग्णाला डिस्चार्ज
Featured

आलमगीर येथील 31 वर्षीय करोना बाधीत रुग्णाला डिस्चार्ज

Sarvmat Digital

उर्वरित 7 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह; 25 रुग्ण करोनामुक्त

अहमदनगर (प्रतिनिधी)- आलमगीर येथील एका 31 वर्षीय करोना बाधीत रुग्णाचा 14 दिवसानंतर घेण्यात आलेले दोन्ही चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला बूथ हॉस्पिटलमधून गुरूवारी डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे करोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता 25 झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे 18 व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी 11 व्यक्तींचे अहवाल बुधवारी निगेटिव्ह आले होते. उर्वरित सात व्यक्तींचे अहवालही गुरूवारी निगेटिव्ह आले आहेत. यामुळे सध्या जिल्ह्यातील करोनाचा संसर्ग नियंत्रणात आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास जिल्ह्याची रेड झोनमधील वाटचाल ग्रीन झोनच्या दिशेने होणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com