Saturday, April 27, 2024
Homeनगरसाहेब आमच्या गावाला वाचवा गवांदे यांची आर्त हाक

साहेब आमच्या गावाला वाचवा गवांदे यांची आर्त हाक

ब्राम्हणवाडा (वार्ताहर)- अकोले तालुक्यातील जांभळे येथील एकाच कुटूंबातील चार जणांचा रिपोर्ट काल पॉझिटिव्ह आल्याने साहेब, आमच्या गावाला वाचवा, अशी आर्त हाक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राज गवांदे यांनी दिली आहे.

जांभळे गावातील सगळ्यांच धामणगाव पाट येथील रुग्णाबरोबर प्रवासचं कनेक्शन आहे. या सर्वांना विलगिकरणात शाळेत ठेवले होते. त्यांच्या संपर्कात त्यांना जेवण, पाणी, कपडे, देणार त्यांचं कुटूंब, त्या कुटूंबातील घटक यात असणार्‍या पॉझिटिव्ह युवकाचा मित्र परिवार, त्यांची कुटूंब ही फार मोठी साखळी वाढू शकते. वेळीच उपाय योजना जर केल्या नाहीत तर मात्र संपूर्ण गाव शेजारील गाव, तालुका अडचणीत येऊ शकतो, असा गंभीर इशारा राज गवांदे यांनी दिला आहे.

- Advertisement -

या परिवाराच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ क्वारंटाईन करणे गरजेचे आहे. किंवा त्यांची तपासणी करणे गरजेचे आहे. अन्यथा फार बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात गावातील बरेच तरुण मुलं आली असल्याची कुजबुज सुरू आहे. गेल्या तीन दिवसापूर्वी पहिला पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर नायब तहसीलदार व्यतिरिक्त प्रशासनाचा कोणीही अधिकारी, साधा पोलीस सुद्धा अद्यापही गावात आलेला नाही.तालुक्यातील सगळ्यात जास्त रुग्ण संख्या होऊनही पोलीस यंत्रणा अजूनही गावाकडे फिरकली नाही.

त्यामुळे कोणीही कोणाचा ऐकत नाही. प्रशासनाने तात्काळ गावात जाऊन या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन करणे गरजेचे आहे. अन्यथा फार मोठा अनर्थ घडू शकतो. या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेली त्यांचे कुटूंबीय त्यांची मुलं यांचा गावात अनेकांशी संपर्क आलेला आहे.

गेल्या काही दिवसात मुंबईहून आलेल्यांची संख्या 91 आहे. या सर्वांची तपासणी करण गरजेचं आहे. यातील फक्त 10 लोकच शाळेत विलगिकरणात होते. त्यापैकी 4 पॉझिटीव्ह निघाल्यामुळे सगळ्यांचे धाबे दणाणले आहेत. सरपंच महिला, पोलीस पाटील महिला त्यामुळं खूप अडचण होत आहे. कमिटीतील तलाठी यांनी गावात येणे, थांबणे गरजेचं असूनही त्यांना अजूनही गावकर्‍यांनी पाहिलं नाही.

त्यामुळं कमिटी असून नसल्यासारखीच आहे असेही त्यांचे म्हणणे आहे.पदाधिकार्‍यांच्या कुटूंबातील माणसंच मुंबई पुण्यावरून आल्यामुळे व घरी ठेवल्यामुळे त्यांनीच विलगीकरणाचा नियम न पाळल्यामुळे त्यांचं गावात कोणीच ऐकत नाही, रुग्ण संख्या वाढीचं हे सुद्धा कारण असून प्रशासनाने आमच्या गावाला वाचवावे असे कळकळीचे आवाहन राज गवांदे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या