मुथाळणेत दोन गटात तुफान हाणामारी

jalgaon-digital
4 Min Read

माजी सरपंचाच्या पतीसह 25 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल

अकोले (प्रतिनिधी) – मुथाळण्याच्या माजी सरपंचाच्या पतीला मारहाण झाल्या प्रकरणी अकोले पोलिसांत अकरा लोकांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल झाला असतानाच त्यांच्या विरुद्ध अकोले पोलिसांत एका डॉक्टरने आपल्या घरावर हल्ला केल्याच्या तक्रारीवरून अकोले पोलिसांनी या माजी सरपंचाच्या पती सह 25 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अकोले पोलिसांत डॉ. दत्तात्रय कचरू सदगीर (हल्ली राहणार अंबाडी, तालुका भिवंडी, मूळ राहणार- मुथाळणे यांनी 25 लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली असून या प्रकरणी अकोले पोलिसांनी आरोपी बाळासाहेब पुंजा सदगीर, पोपट गणपत सदगीर, मारुती गणपत सदगिर, कोंडाबाई गणपत सदगीर, भाऊसाहेब गणपत सदगीर, सरिता बाळू सदगीर, जिजाबाई पुंजा सदगीर, अनिल पुंजा सदगीर, मीराबाई पोपट सदगीर, गणेश नामदेव सदगीर, सखुबाई भाऊसाहेब सदगीर, सगुण मारुती सदगीर (सर्व राहणार मुथाळणे) यांच्यासह 10 ते 15 लोक यांचे विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 103/2020 भादंवि कलम 143, 147, 148, 149, 324, 452, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली हकीकत अशी कि, 7 एप्रिल 2020 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत डॉ. सदगीर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी व भाऊ-देवराम कचरू सदगीर असे दोघे हातात टॅक्टरसाठी डिझेल घेवुन शेतात जात असतांना आमचे राहते घराचे समोर चौफुली वर आमचा भाऊबंद बाळासाहेब सदगीर व त्याचे बरोबर 10-12 इसम उभे होते.

त्यांनी आम्हाला थांबवले. त्यातील दोन इसमाने आमच्या जवळचे डिझलचे ड्रॅम घेवुन ओतून दिले. तेव्हा मी बाळासाहेब पुंजा सदगीर यास दारु पिलेले हे इसम कोण आहे. असे विचारले असता ते होमगार्ड असल्याचे त्याने सांगितले. मी त्याना विचारले होमगार्ड दारु पिवुन कसे काय? त्यावेळी ते दोन इसम मला म्हणाले, तू आम्हाला विचारणारा कोण ? असे म्हणून बाळासाहेब पुंजा सदगीर याने हाताने मारले. मी गाडीवरुन खाली पडलो त्यात माझ्या हाताला लागले. त्यानंतर माझा भाऊ देवराम कचरु सदगीर यास इतर इसमाने काठीने व दगडाने मारले. आमच्या मोटार सायकलचे वरील इसमांनी तोडफोड करुन नुकसान केले आहे.

आरोपी आम्हाला मारहाण करित असताना चक्रधर भिमाजी सदगीर तेथे आले. त्यानी भांडण सोडवुन आम्हाला घरी घेवुन आले.त्यानंतर आम्ही घरात असताना 11.30 वा चे सुमारास बाळासाहेब पुंजा सदगीर, पोपट गणपत सदगीर, मारुती गणपत सदगीर, बाळु पुंजा सदगीर, कोडाबाई गणपत सदगीर, भाऊसाहेब गणपत सदगीर, सरिता बाळु सदगीर, जिजाबाई पुंजा सदगीर, अनिल पुंजा सदगीर, मिराबाई पोपट सदगीर, गणेश नामदेव सदगीर, सखुबाई भाऊसाहेब सदगीर, सगुणा मारुती सदगीर व इतर 10 ते 15 अनोळखी इसम नाव गाव माहीत नाही असे आमच्या घरात शिरले.

त्यांच्या हातात दगड व काठ्या होत्या. अनिल पुंजा सदगीर याने माझे वडिल कचरु सदगीर यांना दगडाने डोक्यात मारुन जखमी केले. तसेच जिजाबाई पुंजा सदगीर हिने माझी आई लक्ष्मीबाई कचरु सदगीर हिस शिवीगाळ केली. पोपट गणपत सदगीर याने वडिलाच्या खाद्यावर काठीने मारले. त्यात माझे वडिल बेशुध्द पडले. तसेच सरिता बाळु सदगीर हिने माझी वहिनी पुष्पा देवराम सदगीर हिस काठीने मारले तसेच सगुणा मारुती सदगीर हिने माझी पुतनी आदिती देवराम सदगीर हिस पाठीवर काठीने मारले व तिच्या पोटात भाऊसाहेब गणपत सदगीर याने दगड मारायचा प्रयत्न केला असता तो माझा भाऊ बाळासाहेब कचरु सदगीर यांच्या डोक्यास लागला.

त्यानंतर मारुती गणपत सदगीर व कोंडाबाई गणपत सदगीर हे दगड मारत असताना तो दगड बाळासाहेब पुंजा सदगीर यास लागला. वरील सर्व इसमांनी घरास घेराव घातला व तुम्ही कशी काय तक्रार देता व तक्रार दिल्यास तुमच्या घरातील सर्व इसमांना जाळुन मारुन टाकु अशी जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच मारहाणीत माझ्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची चैन गहाळ झाली आहे असेही त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *