Friday, April 26, 2024
Homeनगरअकोले एमआयडीसीच्या स्थळ निरीक्षणास मंजुरी

अकोले एमआयडीसीच्या स्थळ निरीक्षणास मंजुरी

अकोले (प्रतिनिधी)- अकोले तालुक्यात एम.आय.डी.सी. व्हावी यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असून, एम.आय.डी.सी. चे प्रादेशिक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सौ. हेमांगी पाटील (नाशिक) यांचेकडे याबाबतचा प्रस्ताव नुकताच दाखल करण्यात आला आहे. येत्या 4-5 दिवसांमध्ये तालुक्यात सुचविलेल्या चारही ठिकाणांच्या स्थळनिरीक्षणाचे आदेश मुख्य भू-मापक सुधीर उगले व क्षेत्र व्यवस्थापक माणिक लोंढे यांना देण्यात आल्याची माहिती ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये दिली.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र, शाखा अकोलेच्यावतीने प्रस्ताव दाखल करण्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक यांच्यासह तालुका सचिव दत्ता रत्नपारखी, सदस्य राम रूद्रे, मायको नाशिकचे अधिकारी अशोक मंडलिक आदी उपस्थित होते. यावेळी एकूण 184 पानांचा प्रस्ताव दाखल करण्यात आला असून सदर प्रस्तावाचे तात्काळ निरीक्षण उपजिल्हाधिकारी सौ. पाटील यांनी केले असून तालुक्यातील लिंगदेव, धामणगाव आवारी, राजूर व देवठाण या ठिकाणांच्या स्थळ निरीक्षणाचे आदेश संबंधित अधिकारी सुधीर उगले व माणिक लोंढे यांना दिले आहेत.

- Advertisement -

येत्या 4-5 दिवसांत प्रमुख भूमापक सुधीर उगले व माणिक लोंढे यांचे पथक अकोल्यात दाखल होणार असून, लवकरात लवकर स्थळ निरीक्षण अहवाल शासनाला सादर होणार असल्याची माहिती तालुका सचिव दत्ता रत्नपारखी यांनी दिली. गत 7-8 महिन्यांपासून अकोले तालुक्यात एम.आय.डी.सी. व्हावी यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, शाखा अकोले सातत्याने पाठपुरावा करत होती.

त्याचाच पुढील भाग म्हणून स्थळ निरीक्षण अहवाल लवकरात लवकर होत असून, या कामी एम.आय.डी.सी. च्या नाशिक विभागाच्या स्वीय सहाय्यक सौ. एस. एस. जाधव, ग्राहक पंचायतचे अध्यक्ष दत्ता शेणकर, रमेश राक्षे, अ‍ॅड. भाऊसाहेब वाळुंज, सीताराम भांगरे, प्रकाश नवले, महेश नवले, अ‍ॅड. दीपक शेटे, प्रा. डॉ. सुनील शिंदे, रामहरी तिकांडे, माधवराव तिटमे, शिवाजी पाटोळे, जालिंदर बोडके, राम भांगरे, संजय वाकचौरे, कैलास तळेकर, राजेंद्र घायवट, शोभा दातखिळे, प्रतिभा सूर्यवंशी, शारदा शिंगाडे, भाऊसाहेब वाकचौरे, किरण चौधरी, प्रकाश कोरडे, संदीप कानवडे, सुरेश पवार, दत्ता देशमुख, रामदास पवार, सुदाम मंडलिक, दत्ता ताजणे, प्रमोद मंडलिक, रामदास पांडे, नरेंद्र देशमुख, ज्ञानेश्वर पुंडे, राजेंद्र लहामगे, नवनाथ आवारी, किसन आवारी, सखाहरी पांडे, मच्छिंद्र चौधरी, निरंजन देशमुख, दत्ता मंडलिक, भाऊसाहेब गोर्डे आदींनी सातत्याने खुप परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या