Wednesday, April 24, 2024
Homeनगरअकोले तालुक्यात तिघांना करोना

अकोले तालुक्यात तिघांना करोना

वाघापूर येथील महिला, जांभळेच्या पुरुषास व बोरीच्या युवकाचा समावेश

अकोले (प्रतिनिधी)- मुंबई परिसरातून अकोले तालुक्यात आलेल्या वाघापूर येथील 62 वर्षीय महिला, जांभळे येथील 53 वर्षीय व्यक्ती करोनाची लागण झाली असल्याचा तपासणी अहवाल रविवारी राञी उशीरा प्रशासनास मिळाला. त्यात आज बोरी येथील एक 32 वर्षीय युवकास बाधा झाल्याचे रात्री निष्पन्न झाले. त्यामुळे तालुक्यातील करोना बाधिताची संख्या आता 12 झाली आहे.

- Advertisement -

मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून अकोले तालुक्यात येणार्‍याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर मुंबई परिसरातून अकोले तालुक्यात आलेल्या दोघांना बाधा झाली आहे. धामणगाव पाटच्या करोना बाधित रूग्णाच्या सोबत त्याचा चुलत भाऊही जांभळे गावी आला होता. मूळ जांभळे येथील रुग्ण असल्याने गावकर्‍यांनी धसका घेतला होता.

धामणगाव पाटचा रुग्ण घाटकोपरहून ज्या गाडीत आला त्याच गाडीत त्याने आपल्या जांभळ्यातील चुलत भावाला आणले, त्याला तीन दिवसांपूर्वी जांभळ्यात सोडून तो पुढे गेला, दोन दिवसांपूर्वी जांभळे येथील शाळेत विलगिकरणात त्याला त्रास जाणवू लागल्यामुळे दोन दिवसांपूर्वीच रात्रीच त्याला तपासणीसाठी नगर सिव्हिल हॉस्पिटलला नेण्यात आले होते. त्याच्या बरोबरच त्याचा मूलगा देखील त्याच रूममध्ये होता. बाजूच्या रूममध्ये एक कुटुंब होते. त्याला नेल्यामुळं सगळ्यां गावकरी चिंतेत होते.

रात्री उशिराने त्याचा तपासणी अहवाल आला असून एक पॉझिटिव्ह तर अन्य निगेटिव्ह आले आहेत. तसेच मुंबई वरुन वाघापूर येथे आलेली 62 वर्षीय महिलेला देेखिल करोनाची बाधा झाली असल्याचा तपासणी अहवाल रविवारी रात्री आला .

दरम्यान आज रात्री तालुक्यातील बोरी येथे घाटकोपर येथून आलेल्या एका 32 वर्षीय युवकास करोनाची बाधा झाली असल्याचा अहवाल रात्री प्रशासनास प्राप्त झाला. हा रुग्ण दहा -बारा दिवसांपूर्वी आपल्या आई वाडीलांसह पुतण्याला घेऊन आपल्या बोरी या मूळ गावी आला होता.त्याला गावातील ग्राम सुरक्षा समितीने कोरंटाइन केले होते.अशी माहिती बोरीचे उपसरपंच संजय साबळे यांनी दिली.

संबंधित युवकाच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेऊन त्यांचीही तपासणी केली जाणार आहे. त्या 32 वर्षीय युवकास त्रास जाणवू लागल्याने आरोग्य यंत्रणेने त्यास नगरला पाठविले होते, त्याचा अहवाल आज रात्री प्राप्त झाल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजित गंभीरे यांनी सांगितले.त्याचा रिपोर्ट रात्री पॉझिटिव्ह आल्याने बोरी गावात खळबळ उडाली आहे.त्यामुळे तालुक्यातील करोना बाधिताची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत चालली आहे.

शिक्षकाचा अहवाल निगेटिव्ह
अकोले तालुक्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे काल सोमवारी तालुक्यातील लिंगदेव येथे मुंबई येथून आलेला पहिला करोना बाधीत 56 वर्षीय शिक्षकाचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला अहमदनगर येथील धुत हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. नगर येथे असलेले अन्य रुग्णही घरी पोहचले आहेत तर समशेरपूर येथे मुलुंड-मुबंई येथून आलेला 39 वर्षीय रिक्षा चालकावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होता. संबंधित रुग्णही बरा होऊन घरी परतल्याने समशेरपूर व लिंगदेवकरांचे टेंशन कमी होण्यास मदत झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या