अकोलेत भाजपकडून खा. राऊत यांचा निषेध
Featured

अकोलेत भाजपकडून खा. राऊत यांचा निषेध

Sarvmat Digital

अकोले (प्रतिनिधी)- देशाचा मानबिंदू छत्रपती शिवरायांचा अवमान व त्यांच्या वंशजाचा अपमान हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे, हा अवमान करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा जाहीर निषेध अकोले तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने करण्यात आला आहे.
भाजपच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवराय हे देशाचे मानबिंदू असल्याने ते युगपुरुष आहेत, त्यांचा अवमान देशाचा अवमान आहे.

त्यामुळे खासदार संजय राऊत यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, सभापती दत्तात्रय बोर्‍हाडे, उपसभापती दत्तात्रय देशमुख, संघटन सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, मच्छिंद्र मंडलिक, पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण शेळके, युवा सरचिटणीस सुनील उगले, उपाध्यक्ष वाल्मिक देशमुख, सुशांत वाकचौरे, राहुल चव्हाण, शारदाताई गायकर, बाबासाहेब उगले, कैलास तळेकर, दत्ता रत्नपारखी आदींनी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com