Wednesday, April 24, 2024
Homeनगरअजानला शिवसेना, भाजप नेत्यांचा विरोध

अजानला शिवसेना, भाजप नेत्यांचा विरोध

सामाजिक तेढ व करोना फैलावण्याचा धोका असल्याचे मत

अहमदनगर (प्रतिनिधी)- करोना प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सर्व धार्मिक ठिकाणी कार्यक्रमास बंदी असतानाही शहर पोलिसांनी नगर शहरातील 23 मशिदीत आजानसाठी परवानगी दिली. एका समाजाला एक न्याय व दुसर्‍या समाजाला वेगळा न्याय, त्यामुळे समाजात तेढ निर्माण होत आहे. तसेच, करोना संसर्ग होण्याचा धोका असल्याने याची दखल घ्यावी, अशी मागणी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी संयुक्त निवेदनात केली आहे.

- Advertisement -

माजी आमदार अनिल राठोड, शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, भाजप नेते माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर, पंडित दिनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा यांनी हे निवेदन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना दिले आहे. त्यात म्हटले की, नगर शहरात करोना प्रसार होऊ नये यासाठी पोलीस, महापालिका प्रशासन चांगले काम करत आहे. परंतु, काही विशिष्ट समुहामुळे नगर रेड झोनमध्ये गेले होते. 28 एप्रिल रोजी मशिदीत आजान सांगण्यासाठी परवानगी दिल्याचे वर्तमानपत्रातून समजले.

काही दिवसांपूर्वी अनेक धार्मिक सण होऊन गेले. यामध्ये हनुमान जयंती, राम नवमी, इष्टरसंडे, महावीर जयंती हे उत्सव लोकांनी घरातच साजरे केले. असे असताना आपण मशिदीत आजान करण्यास खरंच परवानगी दिली आहे का? सर्वोच्च न्यायालयाने यावर निर्बंध घातले आहे, तो न्यायालयाचा अवमान होऊ शकतो. अनेक मशिदीतून आजान देण्यात आले यांचे आमच्याकडे पुरावे आहे.

या एका कारणामुळे नगर शहरात करोनाची वाढ होऊ नये याची गंभीर दखल घ्यावी. या निर्णयामुळे एका समाजाला एक न्याय व दुसर्‍या समाजाला वेगळा न्याय त्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे. तरी याची गंभीर दखल घ्यावी. निवेदनाच्या प्रती नाशिक पोलीस आयुक्त, नाशिक विभागीय आयुक्त, पोलीस अधीक्षक नगर यांना पाठविल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या