नगर : तालुक्यातील भातोडी पारगावात दुधामध्ये पावडरीची भेसळ

नगर : तालुक्यातील भातोडी पारगावात दुधामध्ये पावडरीची भेसळ

अहमदनगर (प्रतिनिधी) – तालुक्यातील भातोडी पारगाव येथील हिरामन शिंदे यांच्या दूध संकलन केंद्रावर आज दुपारी भेसळीचे दूध पकडले आहे. दुधात भेसळ होत असल्याचे अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा समोर आले आहे. हिरामन शिंदे हा “व्हे पावडर” दुधामध्ये भेसळ करून ती दूध डेअरीला पाठवत होता ,अशी माहिती सहाय्यक आयुक्त संजय शिंदे (अन्न) यांनी दिली.

अन्न सुरक्षा अधिकारी कालिदास शिंदे, नमुना सहाय्यक प्रशांत कसबीकर यांनी भेसळीचे नमुने ताब्यात घेतले आहे. या कारवाईत सुमारे दीड लाख रुपयांची भेसळसाठी वापरण्यात येणारी व्हे पावडरीच्या २३ गोण्या आढळल्या. अन्न व औषध प्रशासनाने भेसळीच्या मुद्देमालासह इतर साहित्य असे दीड लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com