नेवासा – सोनाराचा सात लाखाचा ऐवज लुटणारे आरोपी जेरबंद
Featured

नेवासा – सोनाराचा सात लाखाचा ऐवज लुटणारे आरोपी जेरबंद

Sarvmat Digital

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – नेवासा तालुक्यात खेडले परमानंद-पानगाव शिवारात सोनाराला लुटणारे आरोपी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.

२२ जानेवारी २०२० रोजी संध्याकाळच्या सुमारास पानेगांव ते खेडले परमानंद रोडने पानेगांव शिवारात निखील बाळासाहेब अंबीलवादे हे सोन्याची दुकान बंद करुन जात असता आरोपी शाहरुख सांडु सय्यद व सौ.अलीशा अजीज शेख यांनी अंबीलवादे यांची बॅग घेऊन पोबारा केला होता. गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. सदर आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास चालू आहे.

Deshdoot
www.deshdoot.com