विदेशांतून आलेले कर्जत तालुक्यातील पाचजण कोरोनामुक्त
Featured

विदेशांतून आलेले कर्जत तालुक्यातील पाचजण कोरोनामुक्त

Sarvmat Digital

कोरोनाच्या वातावरणामुळे 15 दिवसांसाठी कठोर उपाययोजना करण्याचे आदेश

कर्जत (तालुका प्रतिनीधी) – विदेशामधून कर्जत तालुक्यात आलेल्या पाच नागरिकांची तपसाणी करण्यात आली मात्र एकही करोनाबाधित रुग्ण नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दुसरीकडे करोनाचा प्रभाव न्यायालयाच्या कामाकाजावर झाला. कर्जत न्यायालयाच्या कामाची वेळ कमी करण्यात आली असून फक्त महत्त्वाच्या खटल्यांचेच काम सुरू राहणार आहे. न्यायालयामधील वकिलांच्या बारचे ऑफीस देखील बंद ठेवण्यास सांगितले असून कॅण्टीन पण बंद ठेवा असे आदेश दिले आह.

एवढेच नाही तर न्यायालयातील कर्मचारी देखील एकाच दिवशी सर्वजण कामावर न येता आलटून पालटून कामावर यावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालय व नगर येथील जिल्हा न्यायालय यांनी दिला आहे. न्यालयाच्या कामाकाजावर परीणाम कर्जत येथिल न्यायालयामध्ये आता रोज सकाळी 11 ते दुपारी 2 वाजे पर्यत कामकाज चालणार आहे यामध्येही महत्वाचे जामीन यामध्ये अटकपूर्व जामीन, गंभीर गुन्हयातील आरोपीबाबत कामकाज तसेच 164 मध्ये येणारे गुन्हे अशा प्रकारे जे महत्चाचे खटले आहेत त्यांचेच कामकाज चालणार आहे. इतर खटल्यांना तारीख देण्यात येत आहे.

कर्जत न्यायालयामध्ये आज कारोनाचा प्रभाव दिसून आला. परिसरात फारशी गर्दी नव्हती. सकाळी काम सुरू होताच अनेक खटल्यांना पुढील तारखा देण्यात आल्या या शिवाय न्यायालयात वकील देखील तोंडाला रुमाल बांधून कामकाजात भाग घेत होते तर न्यायालयामध्ये आलेल्या अनेक पक्षकांरानी व पोलीस कर्मचारी यांनी सुरक्षेच्या दृष्टिने तोंडाला मास्क बांधलेले दिसून आले.

कर्जत तालुक्यात आरोग्य विभाग देखील करोना बाबत चंागलाच दक्ष झाला आहे. तालुक्यात परदेशांतून आलेल्या पाच नागरिकांची कसून आरोग्य तपासणी करण्यात आली. 14 दिवसांपासून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आले होते. त्यांच्यात करोनाची कोणतेही लक्षणे आढळून आलेले नाहीत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

उपजिल्हा रुग्णालय सज्ज
कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर आणि कर्मचारी देखील कोरोना बाबत सज्ज असून येणार्‍या रुग्णांची तपासणी होत आहे. याचप्रमाणे या आजारा पासून कोणती काळजी घ्यावयाची याची माहिती देण्यात येत आहे तसेच रुग्णालयातील सर्व कर्मचार्‍यांना देखील या आजाराबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.

उपजिल्हा रुग्णालय येथे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. कोणासही काही त्रास वाटला तर तात्काळ कळवावे आम्ही आरोग्य सेवा तातडीने देऊ नागरिकांनी पण काळजी घ्यावी.
– डॉ. एस. बी. डफळ

शासन आणि आरोग्य विभाग यांनी पुरेशी काळजी घेतली आहे. त्यामुळे धोका कमी झाला आहे मात्र नागरिकांनी गर्दीमध्ये जाऊ नये. हात स्वच्छ ठेवावेत तसेच सार्वजनिक कार्यक्रम घेऊ नयेत स्वत:ची काळजी घ्यावी.
– डॉ शबनम इनामदार

कर्जत तालुक्यात विदेशांत फिरण्यासाठी गेलेल्या पाच नागरिकांची तपासणी केली असून कोणासही करोनाची लक्षणे नाहीत. मात्र अजून कोणी परदेशांमधून आले असतील तर त्यांनी तपासणी करून घ्यावी. तसेच ज्यांना सर्दी खोकला ताप याचा त्रास होत आहे त्यांनी घरीच थांबावे व मास्क वापरावे आणि आरोग्य विभागास कळवावे.
-एस. बी. पुंड तालुका आरोग्य आधिकारी

Deshdoot
www.deshdoot.com