मुंबई – ७२ कैद्यांना करोनाची लागण

मुंबई – ७२ कैद्यांना करोनाची लागण

मुंबई – ऑर्थर रोड तुरुंगातील स्वयंपाकीच्या माध्यमातून एका बॅरेकमधील 72 कैद्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. या कैद्यांना मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून तुरुंगाबाहेर क्वारंंटाईन करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. जिल्ह्यातील गडचिंचले येथे झालेल्या हत्याकांडाच्या ठिकाणाची पाहणी करण्यासाठी तसेच तेथील नागरिक व अधिकार्‍यांशी चर्चा करण्यासाठी गृहमंत्र्यांनी गुरुवारी सकाळी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात करोनाविषयी तसेच इतर घटनांबाबत आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, तुरुंगात असलेल्या कैद्यांना करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून टाळेबंदीच्या काळात आठ तुरुंगामध्ये टाळेबंदीची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. अशा तुरुंगामध्ये या काळात कुणालाही आत-बाहेर जाण्याची मुभा देण्यात आली नव्हती. तरी देखील एका स्वयंपाकीला झालेल्या करोना संसर्गामुळे आर्थर रोडमधील कैद्यांना आजाराने ग्रासले आहे. राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या तुरूंगामध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांची संख्या असल्याने सुनावणी दरम्यान (अंडरट्रायल) च्या स्थितीत असलेल्या सुमारे साडेपाच हजार कैद्यांना यापूर्वी जामिनावर सोडून देण्यात आले आहे. सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या तसेच गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी नसलेल्या इतर सुमारे साडेपाच हजार कैद्यांना पॅरोलवर सोडून देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला असून या निर्णयामुळे राज्यातील विविध तुरुंगातील अकरा हजार कैदी संख्या कमी होईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com