राज्यातून जवळपास ५ लाख २० हजार मजुरांना स्वगृही पाठवले – गृहमंत्री
Featured

राज्यातून जवळपास ५ लाख २० हजार मजुरांना स्वगृही पाठवले – गृहमंत्री

Sarvmat Digital

मुंबई – राज्यात लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या परराज्यातील जवळपास ५ लाख २० हजार कामगारांची पाठवणी विशेष श्रमिक ट्रेनद्वारे त्यांच्या राज्यात करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

ते बोलतांना म्हणाले, अनेक राज्यातील कुशल, अकुशल कामगार महाराष्ट्रात लॉकडाऊनने अडकून पडले होते. त्यांच्या विनंतीनुसार नियमांचे पालन करून ३२५ ट्रेनने कामगार, मजूरांची पाठवणी त्यांच्या मूळ राज्यात करण्यात आली आहे. तिकीट खर्च राज्य शासनामार्फत चालू असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच ज्या कामगारांचे नाव यादीत असेल आणि त्यांना फोन आला असेल तरच त्यांनी संबंधित ट्रेनसाठी रेल्वे स्टेशनला यावे. रेल्वे स्टेशनवर विनाकारण गर्दी करू नये. त्यांच्या तिकीटाचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र राज्य शासनाने केलेला आहे त्यांना तिकीट काढण्याची गरज नाही याची नोंद घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com