Featured
जम्मू-काश्मीर मधील कुपवाडामध्ये झालेल्या चकमकीत ५ जवान शहीद.!
दिल्ली – एकीकडे संपूर्ण देश कारोनाशी लढत असताना जम्मू-काश्मीर मधील कुपवाडा गावात भारतीय सैन्य आणि घुसखोरांमध्ये झालेल्या चकमकीत ५ सैनिक शहीद झाले आहेत. त्यातील २ सैनिक उपचारादरम्यान शहीद झाले आहे. तसेच या चकमकीत 5 घुसखोरही ठार झाले आहेत.
अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले, नियंत्रण रेषेजवळ झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या जवानांची ओळख पटली असून संजीव कुमार, देवेंद्र सिंह, बाल कृष्णा, अमित कुमार आणि छत्रपाल सिंह अशी त्यांची नावे आहे. तसेच खराब हवामानामुळे जखमी जवानांना आणण्यात समस्या येत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.